अभंग समचरणदृष्टि विटेवरी साजिरी

अभंग १

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥

आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥

ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥

अर्थ :- त्याचे चरण जुळलेले असून ते वितेवर आहेत. दृष्टी सरळ सुशोभित अशी आहे. हे हरी , तेथे माजी वृत्ति सतत राहो. हे इश्वरा, मायने भरलेले अन्य कोणतेही पदार्थ मला आवडत नाही. अश्या ठिकाणी माजी वृत्ति कधीच जाउ देऊ नकोस. ब्रम्हादि पदासारखि सारी पडे उपभोगाची आणि दू:खकारक आहेत, हे जाणुनही त्या वस्तुकडे माझे ध्यान आकर्षिले जाईल; परंतु तू तसे होउ देऊ नको. जी कर्म व धर्म आहेत, ते सर्व नाशवंत आहेत, हे सत्य आम्हाला कळालेले आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात.

।।राम कृष्ण हरी।।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *