अभंग राजस सुकुमार मदनाचा पुतळा

अभंग ४

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥

कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥

मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥

कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥

सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥

अर्थ:- राजस, सुकुमार ऐसा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतुळा आहे. सूर्य-चंद्राच्या प्रभा त्याच्या तेजयात लपल्या आहे. त्याच्या कपाळि कस्तूरिचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची ऊटी लावलेली आहे. गळ्यात वैजयंतीमाळा रूळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले सुन्दर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगर आहे. त्याने कमरेला जरीकाठी पितांबर नेसले आहे व् भरजरि शेला पांघरला आहे. बायानो असा हा विठुराया सवल्या रंगाचा आहे. तुम्हीही सर्वांनी हे रूप मनात जपुन ठेवावे. ऎसे श्रीमुख पहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लागत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *