संत वर्णन

अभंग आपुलिया हिता जो असे जागता

तुकाराम महाराज गाथा भाष्य आपुलिया हिता जो असे जागता | धन्य मातापिता तयाचिया ||१|| कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक | तयाचा हरिख वाटे देवा ||२|| गीता भागवत करिती श्रवण | अखंड चिंतन विठोबाचे ||३|| तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा | तरी माझ्या दैवा पार नाही ||४|| जो आपल्या कल्यानाविषयी जागरूक असतो त्यांचे आईबाप धन्य …

अभंग आपुलिया हिता जो असे जागता Read More »

संत चोखामेळा

‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत. संत चोखोबा हे संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले संत!  संत शिरोमणी नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे ते होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात …

संत चोखामेळा Read More »

संत बहिणाबाई

बहिणाबाईंचा जन्म वेरुळच्या पश्चिमेकडे, वैजापूर तालुक्यातील देवगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जानकी व पित्याचे नाव आऊजी कुलकर्णी. बहिणाबाई या वारकरी संप्रदायाच्या शेवटच्या संत कवयित्री. त्यांचे लग्न वयाच्या तिसऱ्या वर्षीच झाले. त्यांचा नवरा बिजवर होता. त्याचे वय तीस वर्षाचे होते. त्यामुळे बहिणाबाई यांच्या वाट्याला जास्तच दुःख आले. एकदा संत तुकारामांचा अभंग त्यांच्या वाचनात आला. बहिणाबाईंनी …

संत बहिणाबाई Read More »

संत सोपानदेव

संत सोपानदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई ही चारही भावंडे महाराष्ट्राला संत म्हणून परिचित आहेत. या चारही भावंडांचा जन्म आळंदी येथे झाला. निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताबाई या तीनही भावंडांचे कार्य ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्यास पूरक आहे.सोपानदेवांना वारकरी संप्रदायात सोपानकाका असे संबोधले जाते. सोपानदेवांचे पन्नास एक अभंग उपलब्ध असून सोपानदेवी नावाचा त्यांनी लिहिलेला …

संत सोपानदेव Read More »

संत जनाबाई

संत जनाबाई या संत नामदेवांच्या काळातील वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. जनाबाईंचा जन्माचा ठोस काळ जरी माहित नसला तरी देखील अंदाज त्यांचा जन्म हा 1258 काळातील असल्याचे काही पुरावे आढळुन येतात. जनाबाईंचे गाव परभणी जिल्हयातील गोदावरीच्या तिरावरचे गंगाखेड. वडिलांचे नाव दमा आणि आईचे नाव करूंड. वडिल विठ्ठल भक्तं तर आईदेखील भगवद्भक्त असल्याने लहानपणापासुन जनाबाईंवर परमात्म्याविषयी त्याच्या …

संत जनाबाई Read More »

संत जनाबाई

संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. जनाबाई ह्या पंढरपूरचे वारकरी ‘दमा’ आणि भगवद्भक्त स्त्री ‘करुंड’ या दांपत्याची मुलगी होत. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयता नियमित पंढरीची वारी करीत असत. …

संत जनाबाई Read More »

संत एकनाथ महाराज

नाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी आश्वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला. नाथांचे मातापिता नाथांच्या बालपणात निवर्तल्यामुळे आजी आजोबांनी नाथांचा सांभाळ केला. बालपणापासूनच नाथांना भगवद्‍भक्‍तीचे वेड. गुरुकृपेने भगवंताची भेट होते हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणीच्या निर्देशाप्रमाणे नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे जनार्दन स्वामी नावाचे दत्‍तभक्‍त किल्लेदार म्हणुन होते. नाथांनी त्यांना पाहताच सद्‍गुरू मानून …

संत एकनाथ महाराज Read More »