संत सोपानदेव

संत सोपानदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई ही चारही भावंडे महाराष्ट्राला संत म्हणून परिचित आहेत. या चारही भावंडांचा जन्म आळंदी येथे झाला. निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताबाई या तीनही भावंडांचे कार्य ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्यास पूरक आहे.सोपानदेवांना वारकरी संप्रदायात सोपानकाका असे संबोधले जाते. सोपानदेवांचे पन्नास एक अभंग उपलब्ध असून सोपानदेवी नावाचा त्यांनी लिहिलेला …

संत सोपानदेव Read More »

संत जनाबाई

संत जनाबाई या संत नामदेवांच्या काळातील वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. जनाबाईंचा जन्माचा ठोस काळ जरी माहित नसला तरी देखील अंदाज त्यांचा जन्म हा 1258 काळातील असल्याचे काही पुरावे आढळुन येतात. जनाबाईंचे गाव परभणी जिल्हयातील गोदावरीच्या तिरावरचे गंगाखेड. वडिलांचे नाव दमा आणि आईचे नाव करूंड. वडिल विठ्ठल भक्तं तर आईदेखील भगवद्भक्त असल्याने लहानपणापासुन जनाबाईंवर परमात्म्याविषयी त्याच्या …

संत जनाबाई Read More »

संत जनाबाई

संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. जनाबाई ह्या पंढरपूरचे वारकरी ‘दमा’ आणि भगवद्भक्त स्त्री ‘करुंड’ या दांपत्याची मुलगी होत. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयता नियमित पंढरीची वारी करीत असत. …

संत जनाबाई Read More »

संत एकनाथ महाराज

नाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी आश्वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला. नाथांचे मातापिता नाथांच्या बालपणात निवर्तल्यामुळे आजी आजोबांनी नाथांचा सांभाळ केला. बालपणापासूनच नाथांना भगवद्‍भक्‍तीचे वेड. गुरुकृपेने भगवंताची भेट होते हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणीच्या निर्देशाप्रमाणे नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे जनार्दन स्वामी नावाचे दत्‍तभक्‍त किल्लेदार म्हणुन होते. नाथांनी त्यांना पाहताच सद्‍गुरू मानून …

संत एकनाथ महाराज Read More »

संत गोरा कुंभार

गोरा कुंभार (इ.स. १२६७ – १० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा[१].संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते.त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (१०एप्रिल १३१७) …

संत गोरा कुंभार Read More »

संत निवृत्तीनाथ महाराज

संतश्रेष्ट श्री निवृत्तिनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत, म्हणून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. श्री निवृत्तिनाथ महाराजांचा जन्म शके ११९५ श्रीमुखनाम संवत्सर, माद्य वद्य प्रतिपदा, सोमवार या दिवशी श्रीक्षेत्र आळंदी येथे झाला. त्यांचे वडील श्री विठ्ठलपंत हे मुळचे श्रीक्षेत्र आपेगाव येथे राहणारे होते. तीर्थयात्रेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून ते श्रीक्षेत्र आळंदी …

संत निवृत्तीनाथ महाराज Read More »

संत नामदेव महाराज

संत नामदेवांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७०चा. म्हणजे ते शिवाजी महाराजांच्याही जवळपास चारशे वर्षं आधीचे. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली होती. दक्षिणेत त्याचा पायरव ऐकू येत होता. धर्माच्या नावाने हिंदू धर्ममार्तंड आणि मुस्लिम शासक बहुसंख्य भारतीयांना दुय्यम दर्जाचं जिणं जगण्यास भाग पाडत होते. त्याविरुद्ध संतपरंपरेनं मोठी क्रांती घडवली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या या क्रांतीचं …

संत नामदेव महाराज Read More »

संत तुकाराम महाराज

“शुध्द बीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ॥”         शुध्द बीजापासून उगम पावलेले, त्यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला वारकरी परंपरेचे अधिष्ठान लाभले व हे काव्य मराठी संस्कृतीची गुण वैशिष्टये सारभूत होउन प्रगट झाले.        मराठी साहित्य समृध्द करणारे हे काव्य मानवी जाणिवांचा आणि मराठी संवेदन स्वभावाचा गाभा स्पर्श करणारा तरल अविष्कार आहे. पेशाने वाणी आणि पिंडाने शेतकरी असल्यामुळे …

संत तुकाराम महाराज Read More »

श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा वर्णन …!

  श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा वर्णन …! विठोजी म्हणे ज्ञानदेवा। तुझी विश्रांती मज ठेवा।ते मुराली आमचीया भावा। निःसंदेह॥कैसे समाधान ज्ञानदेवा। अलंकापूरी समाधी ठेवा।विठ्ठल वोळला वोल्हावा। नित्यरुप समाधी॥संत करिती महा खेद। म्हणती ज्ञानांजन सिध्द।मग चालले विद्वद। अलंकापुरी॥महावल्ली वृक्ष अजान। तो निक्षेपिला पूर्णघन।मग विठोजी म्हणे आपण। ज्ञानदेवांसी॥धन्य धन्य ज्ञानेश्वरा। पुण्यभूमी समाधी स्थिरा।कृष्ण पक्षी तुज निर्धारा। …

श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा वर्णन …! Read More »

संत ज्ञानेश्वर महाराज

संत ज्ञानेश्वरांचा जन्म विठ्ठलपंत – रुक्मिणीबाई या कुळकर्णी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांच्या थोरल्या भावाचे नाव निवृत्तीनाथ तर धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यासाश्रमाचा स्वीकार केला होता. परंतु गुरूच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. त्या काळातील ब्राह्मण समाजास एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणे मंजूर नव्हते त्यामुळे …

संत ज्ञानेश्वर महाराज Read More »