सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांही इच्छा, आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड, पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मीं ऐसें, मागितलें तुज ।
आम्हांसी सहज, द्यावें आतां ॥३॥
तुका म्हणे तुज, ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ, नाहीं आम्हां ॥४॥

संत परंपरा
संत वाङ्‍मय
कीर्तनकार

आमच्याबद्दल थोडेसे

महाराष्ट्र ही संतांची जन्म, कर्मभूमी आहे. या संतभूमीला भागवत धर्माची अर्थात संतांचा, त्यांच्या विचारांचा व आचारांचा पाईक घडवणाऱ्या वारकरी धर्माची उज्वल परंपरा लाभली आहे. विश्व मानवतेला गवसणी घालणारी वैश्विक प्रार्थना येथेच मराठी भाषेत प्रथमत: उद्घोषित झाली. योगियांचे शिरोमणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी इथे विश्वधर्म मंदिराचा पाया रचला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या मंदिराचे कळसस्थानी विराजमान झाले.

सातशे वर्षापुर्वी सुरु झालेली वारकरी धर्माची उज्वल परंपरा, आज जगाच्या कानाकोपर्यात पोहचती आहे. जगभरातल्या मानवतेलाच नव्हे तर समग्र प्राणी मात्रांच्या ऐक्यासाठी प्रार्थना करणारे हे समताप्रधान तत्वज्ञान म्हणूनच सर्वांना साद घालत आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत सोपान महाराज, ब्रहमचित्कला मुक्ताबाई या चार भावंडाबरोबरच भक्त शिरोमणी नामदेव महाराज, श्री संत सावता माळी महाराज, श्री संत चोखोबा व या संत प्रभावळीतील अनेक संतानी बाराव्या शतकात वारकरी धर्म समृध्द केला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीभगवतगीतेचा केलेला मराठी भावार्थ अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव चांगदेव पासष्टी व अभंग गाथा व इतरही संतांचे साक्षात्कारी अनुभूतीप्रधान अभंग हे मराठी भाषेचे अक्षर वैभव ठरले. याच काळात महाराष्ट्रात सर्वदूर तळागाळापर्यत श्री विठठल भक्ती पोहचली. वारकरी धर्माची सर्वसमावेशकता आचरण सुलभता व अभंगाची भाषा यामुळे वारकरी धर्माचा विस्तार झाला.

Our Address

  • Pune | Maharashtra | india
  • +91 97 30 615 169
  • Email: info@jaihari.in

Contact Us